Ad will apear here
Next
फॅशन शोद्वारे शिवकालीन संस्कृतीचे सादरीकरण


पुणे : ‘महाफॅशन फाउंडेशन आणि तष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने १९ फेब्रुवारी २०१९ रोजी बाणेर येथील वृंदावन लॉन्स येथे सायंकाळी साडेसात वाजता ‘शिवजातस्य’ हा फॅशन शो आयोजित केला आहे. शिवजयंतीचे निमित्त साधून शिवाजी महाराजांच्या काळातील पोशाख, अलंकार, पगडी, तसेच इतर सामुग्री फॅशन शोच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न या कार्यक्रमामधून करण्यात येणार आहे,’ अशी माहिती आयोजक आणि तष्ट या संस्थेचे दीपक माने आणि महा फॅशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत गुंड यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी नितीन अगरवाल, क्रिएटिव्ह डिरेक्टर रवींद्र पवार उपस्थित होते.

या वेळी माने यांनी शिवकालीन संकल्पनेबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘आतापर्यंत फॅशन शोच्या माध्यमातून अनेक संकल्पनांवर आधारित विविध प्रांतांच्या  पोशाखांचे सादरीकरण करण्यात आले आहे; परंतु शिवकालीन साम्राज्यातील पेहेराव पहिल्यांदाच ‘शिवजातस्य’ या फॅशन शोमधून दाखवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी लंडन फॅशन वीकमधे हा कार्यक्रम सादर केला गेला होता. या अनोख्या फॅशन शोची संकल्पना लक्ष्मीकांत गुंड यांची असून, पुण्यातील तष्ट संस्थेतर्फे अतिशय कल्पकतेने तयार केलेली वस्त्र प्रावरणे या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत. फॅशन शोचे दिग्दर्शन प्रख्यात फॅशन शो कोरिओग्राफर सत्यजित जोगळेकर यांचे असणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून, विनामूल्य आहे.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/UZPIBX
Similar Posts
‘शिवजातस्य’ फॅशन शोमधून शिवकालीन संस्कृतीचे दर्शन पुणे : शिवजयंतीचे औचित्य साधून महाफॅशन फाउंडेशन आणि तष्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवजातस्य’ या अनोख्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. बाणेरमधील वृंदावन लॉन्स येथे झालेल्या या फॅशन शोमध्ये शिवाजी महाराजांच्या काळातील पोशाख, अलंकार, पगडी आदी प्रकार सादर करण्यात आले. शिवकालीन संस्कृतीबरोबरच या वेळी
निंभोरकरांकडून ‘सर्जिकल स्ट्राइक’विषयी ऐकण्याची पुणेकरांना संधी पुणे : ‘शिवसमर्थ प्रतिष्ठान, मृत्युंजय अमावस्या मंच आणि विवेक व्यासपीठ यांच्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती महोत्सव आयोजित केला असून, या वेळी उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकचे ब्रेन म्हणून ओळखले जाणारे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांना प्रत्यक्ष ऐकण्याची संधी पुणेकरांना लाभणार आहे
ग्रीन कॉरीडोरद्वारे आणलेल्या यकृतामुळे जीवनदान पुणे : एका ब्रेन डेड रुग्णाचे यकृत नाशिक येथून ग्रीन कॉरीडोरचा उपयोग करून, पुण्यातील बाणेरमधील ‘ज्युपिटर हॉस्पिटल’ येथे आणण्यात आले. ज्युपिटर हॉस्पिटलच्या टीमने हे यकृत नाशिकहून अवघ्या तीन तास बारा मिनिटांत आणले. यासाठी नाशिकपासून पुण्यापर्यंत ग्रीन कॉरीडोर तयार करण्यात आला होता.
सिंहगड लोणावळा संकुलमध्ये शिवजयंती उत्साहात कुसगाव : येथील सिंहगड लोणावळा संकुलामध्ये विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्र येत शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language